खानापूर / प्रतिनिधी
रविवारी होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारताच्या विजयासाठी कक्केरी गावातील खेळाडू आणि अखिल कर्नाटक शेतकरी संघटना बेंगळूर व कक्केरी गावातील पदाधिकाऱ्यांनी येथील प्रसिद्ध देवस्थान श्री बिष्ठम्मा देवी आणि बहिण मुकम्मा देवी यांची ओटी भरून होमहवन व पुजा करून देवीला साकडे घातले.
आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये रोहित शर्माच्या संघाने एकदिलाने लढा देत विजय मिळवला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्याच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी अखिल कर्नाटक शेतकरी संघटना प्रदेश उपाध्यक्ष व पदाधिकारी किशोर मिठारी, दत्ता बीडीकर, पांडुरंग बारागुंडी, यल्लाप्पा गुपीत, सुधीर चव्हाण, रमेश वीरापुर, नारायण पाटील, राजू वीरापुर, रमेश वीरापुर, बसवराज हिरेमठ, अशोक अंबडगट्टी, सोनिया पाटील, राजू वीरापुर, रामानंद अंबडगट्टी, बिष्टाप्पा सुंबली, रामू चन्नापुर, प्रदीप मिठारी, गोपाल आगासिमनी, चन्नवीरया हिरेमठ, महंतैया हिरेमठ, विनायक कलाल आदिंनी भारताच्या विजयासाठी देवीला साकडे घातले व विजयासाठी भारतीय क्रिकेट टीमला शुभेच्छा दिल्या.
0 Comments