बेळगाव / प्रतिनिधी
राज्य सरकारने बेळगाव जिल्हयात कार्यरत असलेल्या तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नती देऊन अन्यत्र बदली केली आहे.
यामध्ये बेळगाव मार्केट पोलीस स्थानकाचे एसीपी एन. व्ही. बरमणी,आयजीपी कार्यालयात सेवा बजावत असलेले डीवायएसपी महंतेश्वर जिद्दी तर रामदुर्ग उपविभागाचे डीएसपी रामनगौडा हट्टी यांचा समावेश आहे.
मार्केट पोलिस स्थानकाचे एसीपी नारायण बरमणी यांची धारवाड जिल्हा अतिरिक्त पोलीस अधिक्षकपदी, महंतेश्वर जिद्दी यांची बागलकोट जिल्हा अतिरिक्त पोलिस अधिक्षक पदी तर रामनगौडा हट्टी यांची विजापूर जिल्हा अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने या तिन्ही अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा आदेश बजावला आहे.
0 Comments