बेळगाव / महादेव खोत 

आरपीडी पदवी पूर्व महाविद्यालयात आयोजित केलेल्या आर्टस व कॉमर्स फेस्टचे उद्घाटन  एसकेई संस्थेचे सेक्रेटरी मधुकर सामंत व आरपीडी पदवी पूर्व महाविद्यालयाचे व्हा.चेअरमन ज्ञानेश कलघटगी यांच्याहस्ते करण्यात आले. 

यावेळी एसकेई  संस्थेच्या सदस्या बिंबा नाडकर्णी, माधुरी शानबाग व आरपीडी पदवी पूर्व कॉलेजच्या प्राचार्य सुजाता बिजापूरे व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आर्ट्स व कॉमर्स ही शाखा फक्त पाठ्यपुस्तकांसाठी मर्यादित नसून विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी आहे. आरपीडीपदवी पूर्व महाविद्यालयात कॉमर्स व आर्ट्सच्या विद्यार्थांनी बनविलेले मॉडेल प्रदर्शन भरविण्यात आले असून यामध्ये बेळगावच्या ऐतिहासिक वस्तूंचा इंडस्ट्रीज पेट्रोलपंप यांचा सुद्धा समावेश आहे. हे प्रदर्शन पुढील चार दिवस सुरु राहणार आहे.  शालेय विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निमंत्रण देण्यात आले आहे.  या कार्यक्रमाचे आयोजन आरपीडी महाविद्यालयाच्या रानडे हॉल मध्ये करण्यात आले आहे.