•  महांतेश कवठगीमठ यांची पत्रकार परिषद 

बेळगाव / प्रतिनिधी 

पीयूसी प्रथम वर्षातील हुशार विद्यार्थ्यांना अभियोग्यता चाचणीद्वारे शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय केएलई संस्थेने घेतला आहे. केएलई संस्थेचे संचालक महांतेश कवठगीमठ यांनी आज मंगळवारी केएलई संस्थेच्या आरएलएस कॉलेजच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

या पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले, १९५६ मध्ये स्थापन केलेल्या केएलई संस्थेने आज ३०९ सदस्य संस्थांसह शिक्षण, आरोग्य आणि संशोधन क्षेत्रात जागतिक ओळख मिळवली आहे.

केएलई संस्थेची ३० सायन्स कॉलेज (विज्ञान महाविद्यालये) त्यातही कार्यरत आहेत. यावर्षी अनेक महाविद्यालयांचे निकाल ९० टक्क्यांहून अधिक लागले आहेत. 

नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थी जेईई आणि एनईईटी परीकक्षेतही उत्तीर्ण झाले आहेत. शिक्षणात अनेक बदल झाले आहेत. पारंपारिक शिक्षण दूर होत चालले आहे. व्यावसायिक शिक्षणात बरेच बदल होत आहेत. प्रत्येकवेळी वेळेनुसार नवीन अभ्यासक्रम येत आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक शिक्षण घ्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत स्वतःला घडवणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

नीट परीक्षेत केएलईच्या विद्यार्थ्यांचे यश: 

केएलईच्या जक्कीन होंडा, बेळगाव येथील पीयू कॉलेजची विद्यार्थिनी समृद्धी देसाई, हिने नीट परीक्षेत ७२० गुणांपैकी ७०५ गुण मिळवत देशात १६३ वा आणि राज्यातील महिला विद्यार्थ्यांमध्ये पहिला क्रमांक मिळवला. यावर्षी नीट परीक्षेत ६०० पेक्षा जास्त गुण मिळवणारे २० हून अधिक विद्यार्थी आहेत आणि ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ५०० पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. आतापर्यंत ७१ विद्यार्थ्यांना MBBSEC मध्ये गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश देण्यात आला आहे.

B.D.A. (दंतचिकित्सा) मध्ये २१ विद्यार्थी, नर्सिंगमध्ये १६९  विद्यार्थी आणि B.Pharm मध्ये १६० हून अधिक विद्यार्थी आहेत. केएलईच्या विद्यार्थ्यांनी सीईटीमध्येही अभूतपूर्व कामगिरी केली आहे. सीईटी  मध्ये ५००० पेक्षा कमी रँक मिळविणारे ६० विद्यार्थी आहेत. १६०० हून अधिक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश मिळाला आहे. जेईईमध्ये चांगले गुण मिळवून ५ विद्यार्थ्यांना एनआयआयटीमध्ये तर ३ विद्यार्थ्यांनी आयआयआयटीमध्ये प्रवेश घेतल्याचे त्यांनी सांगितले. केएलई संस्थेचे माजी सदस्य एम.सी.कोळी उपस्थित होते.