- विधानसभा अध्यक्ष यु.टी.खादर यांची माहिती
राज्य सरकारने पुढील महिन्यात सुवर्णसौध येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज अधिवेशनाच्या पूर्वतयारीची माहिती घेण्यात आली आहे. सदर अधिवेशन सुरळीत रित्या पार पाडण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष विशेष प्रयत्न करतील.अशी आशा विधानसभेचे अध्यक्ष यु.टी.खादर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली.
यावेळी पुढे बोलताना खादर म्हणाले, सरकारने प्राथमिक स्वरूपात चार ते पंधरा डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन बेळगावात भरविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीच्या कामाची आज माहिती घेतली आहे.ती सरकारला देण्यात येईल. त्यानंतर सरकारकडून अधिवेशनाच्या तारखे संदर्भात रितसर घोषणा केली जाईल. हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याच्या आणि विशेषता उत्तर कर्नाटकातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने सभागृहात चर्चा केली करून निर्णय घेतले जातील. या कामात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमताने कामकाज चालवतील. अधिवेशनासाठी येणारे मंत्री, आमदार तसेच कामकाज पाहण्यासाठी येणारी जनता व खास करून विद्यार्थी वर्गासाठी चोख व्यवस्था ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना अधिवेशनाचे कामकाज पाहण्यासाठी यावर्षी पास उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची चांगली सोय होणार आहे.असेही खादर यांनी स्पष्ट केले.
यावेळी विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरटी, आमदार राजू शेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, यांच्यासह पोलीस जिल्हाप्रमुख, पोलीस आयुक्त, राज्याचे मुख्य सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
0 Comments