बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तेथे चार डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्याचे पोलीस महासंचालक अलोक मोहन यांनी आज बेळगावला भेट दिली. यावेळी त्यांनी बेळगाव जिल्हापोलीस प्रमुख कार्यालयात विशेष बैठक घेतली. तत्पूर्वी त्यांना बेळगाव पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.
पोलीस महासंचालक अलोक मोहन यांनी जिल्हा पोलिसप्रमुख कार्यालयात घेतलेल्या बैठकीला बेळगाव, बागलकोट, गदग, हावेरी धारवाड जिल्ह्यांच्या पोलीस प्रमुखांसह पोलिस प्रमुख, बेळगाव पोलिस आयुक्त एस. सिद्धरामप्पा, आयजीपी आर. हितेंद्र,आदि उपस्थित होते.
0 Comments