- जेडीएस बेळगाव युनिटची मागणी : चन्नम्मा सर्कल येथे निदर्शने
- जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारने दुष्काळी नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी जेडीएस बेळगाव युनिटतर्फे आज शहरात आंदोलन करण्यात करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. तत्पूर्वी बेळगाव जिल्हा जेडीएसचे जिल्हाध्यक्ष शंकर मुदलगी यांच्या नेतृत्वाखाली चन्नम्मा सर्कल जोरदार निदर्शने करण्यात आली.
शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती सुरू केली, मात्र पावसाअभावी पिके सुकून गेली आहेत. राज्य सरकारने दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना जाहीर केल्या असल्या तरी पुरेशा प्रमाणात मदत वाटप करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. सोयाबीन, ऊस, कापूस या पिकांना नुकसान भरपाई द्यावी आणि संकटात सापडलेल्या
शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक पाठबळ द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी जेडीएसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रताप पाटील, जिल्हाध्यक्ष शंकर मुदलगी यांच्यासह जेडीएसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments