बेळगाव / प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ११ व्या स्मृतिदिनी बेळगाव खडेबाजार,कृष्णज्योती अपार्टमेंटमधील कार्यालयात आज शिवसेनेतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी शिवसेना जिल्हाप्रमुख हणमंत मजूकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी शिवसैनिकांनी 'बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,'परत या, परत या, बाळासाहेब परत या'अशा घोषणा दिल्या.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख हणमंत मजूकर म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सीमावासियांच्या सतत खंबीरपणे पाठीशी राहून सीमा प्रश्नाच्या लढ्याला ताकद दिल्याचे सांगितले. मुंबई, महाराष्ट्र आणि देशातील मराठी बांधवांच्या रक्षणासाठी बाळासाहेबांनी संघर्ष केला. देशातील हिंदूंनी एकसंघ राहून धर्माचे रक्षण करावे, मराठी माणसावर अन्याय होऊ नये यासाठी त्यांनी संघटित व्हावे अशी त्यांची भूमिका होती असे त्यांनी सांगितले.
यावेळी परशराम गोंदकर, विनायक कुंडेकर,अमोल मजूकर, हणमंत जुम्मण्णावर, अशोक देसाई, प्रशांत खन्नूकर, राजू तोरगल, गुरखा, मीनाक्षी पाटील,भारती राक्षे, दिनेश दिवेकर, रमेश पाटील, अभिजित शिंदे, नारायण चंदगडकर, आकाश कुंडेकर, शौकत मुल्ला तसेच शिवसैनिक सीमावासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments