बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ के.आनंद (वय ४०) हे आज शनिवारी सकाळी त्यांच्या शासकीय निवासस्थानी मृतावस्थेत आढळले. गेल्या दीड वर्षांपासून बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ म्हणून कार्यरत असलेले आनंद हे मूळचे तामिळनाडूचे असून ते इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिसचे होते. आज सकाळी त्यांच्या घराला कुलूप असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ कॅम्प पोलिसांना माहिती दिली.माहिती मिळताच कॅम्प पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत निवासस्थानी प्रवेश केल्यावर के.आनंद मृतावस्थेत आढळून आले.
एमएलआयआरसीचे ब्रिगेडियर आणि खडेबाजारच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांनीही नंतर घटनास्थळी पाहणी केली. के.आनंद यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र हा नैसर्गिक मृत्यू आहे की आत्महत्या हे पोलिस तपासनंतरचं स्पष्ट होणार आहे.
बेकायदेशीर भरती आणि कामांच्या आरोपांबाबत एका खाजगी तक्रारीवरून सीबीआयने काही दिवसांपूर्वी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डावर छापा घातला होता. त्यानंतर आज सीईओ के.आनंद मृतावस्थेत आढळले असून त्यांच्या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले आहे.
0 Comments