•  राज्यस्तरीय स्पर्धेत प्राप्त केले उज्ज्वल यश

बेळगाव / प्रतिनिधी  

स्विमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी दि. १७ व १८ ऑक्टोबर २०२३ रोजी बसवणगुडी जलतरण केंद्र, बेंगळूर येथे शालेय शिक्षण विभाग बेंगळूर, कर्नाटक यांच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा - २०२३ मध्ये उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर उज्वल यश प्राप्त केले आहे. अमन सुणगार, सार्थक श्रेयकर, यशराज पावशे, लावण्य आदिमनी, समीक्षा घसारी, चैत्राली मेलगे, आर्यवंश गायकवाड, खुशी हेरेकर, अर्णव निर्मळकर अशी या विजेत्या जलतरणपटूंची नावे आहेत. सदर जलतरणपटूंनी पुढील महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या जलतरणपटूंनी जिंकलेल्या पदकांचा तपशील पुढीलप्रमाणे : 

  •  अमन सुणगार :  ३ सुवर्ण , १ कांस्य
  •  सार्थक श्रेयकर : २ सुवर्ण, २ चांदी, १ कांस्य 
  •  यशराज पावशे :  १ सुवर्ण, १ चांदी, २ कांस्य 
  • लावण्य आदिमनी  :  १ सुवर्ण, २ चांदी 
  • समीक्षा घसारी : ४ चांदी 
  • अभिनव देसाई :  १ चांदी , १ कांस्य 
  • चैत्राली मेलगे : १ चांदी, १ कांस्य  
  • आर्यवंश गायकवाड : १ चांदी 
  •  खुशी हेरेकर : ३ कांस्य
  • अर्णव निर्मळकर : १ कांस्य 

सर्व यशस्वी जलतरणपटूंना उमेश कलघटगी,अक्षय शेरेगार,अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतकर आणि इम्रान उचगावकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सदर जलतरणपटू केएलई जेएनएमसीच्या जलतरण तलावात प्रात्यक्षिकांचा सराव करत आहेत.

या यशाबद्दल डॉ. प्रभाकर कोरे, (केएलई सोसायटीचे चेअरमन), जयंत हुंबरवाडी (अध्यक्ष,जयभारत फाउंडेशन), रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार, माणिक कपाडिया लता कित्तूर, सुधीर कुसाने, प्रसाद तेंडोलकर आणि इतर मान्यवरांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना राष्ट्रीय क्रीडास्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर यश प्राप्त केलेल्या या जलतरणपटूंच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.