- मंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती
बेंगळूर दि. २६ ऑक्टोबर २०२३ :
बेळगावच्या महापौर शोभा सोमनाचे यांनी महापालिकेतील स्वतःची स्वाक्षरी असलेली फाईल गहाळ होणे तसेच नियमबाह्य दुरुस्ती याबाबत सुरु असलेल्या वादाबाबत राज्यपालांना पत्र लिहून महापालिकेतील प्रगतीबाबत चर्चा करण्यासाठी मुदत मागितली आहे. या पत्राला सरकार त्याला उत्तर देईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम तथा बेळगाव जिल्हापालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली आहे.
आज गुरुवार (दि. २६ ऑक्टोबर २०२३) रोजी बेंगळूर येथील कार्यालयातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, मालमत्ता कराच्या सुधारणेबाबत शासनाला माहिती देताना अधिकाऱ्यांकडून छोटीशी चूक झाली असावी. ही कारकुनी चूक आहे. ही मोठी चूक असल्याचे सांगत आमदार अभय पाटील यांनी महापौरांना विनाकारण राज्यपालांना पत्र लिहिण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांनी केला.
बेळगावच्या महापौर शोभा सोमनाचे या आमदार अभय पाटील यांच्या हातच्या बाहुल्याप्रमाणे वागत आहेत. आमदार अभय पाटील अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करत आहेत. महापालिका अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर कारभाराची केंद्रीय लोकसेवा योगाद्वारे चौकशी करण्यात येणार असल्याचे आमदार अभय यांनी सांगितले. हे बेकायदेशीर आहे. अधिकाऱ्यांनी काही बेकायदेशीर कृत्य केले आहे का, याची चौकशी राज्य सरकार स्वतः करेल असे त्यांनी सांगितले.
0 Comments