बेळगाव / प्रतिनिधी
राज्यातील युवा पिढीवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी राज्यात हुक्काबार, तंबाखूवर बंदी घालण्याची मागणी अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेने केली आहे. यासंदर्भात अभाविपच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांच्या नावाचे निवेदन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट घेऊन दिले.या निवेदनात हुक्काबार, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांमुळे तरुणांवर होत असलेल्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधले आहे. देशाचा आधारस्तंभ असलेल्या युवा पिढीचे शारीरिक, मानसिक नुकसान टाळण्यासाठी राज्यात तातडीने हुक्काबार, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालून तसा आदेश जारी करावा अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी सचिन हिरेमठ, शिवू बिज्जरगी, मल्लिकार्जुन पुजारी, देवेंद्र सन्नाप्पनवर, कीर्ती रेवणकर यांच्यासह अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments