बेंगळूर दि. ६ ऑक्टोबर २०२३
कर्नाटक राज्य भाजपमध्ये नेतृत्व निवडीबाबत पक्ष हायकमांड दिरंगाईचे धोरण अवलंबत असून एवढा विलंब होणे खरोखरच वेदनादायी असल्याचे डी.व्ही. सदानंद गौडा म्हणाले, भाजपबरोबर युतीच्या निषेधार्थ जेडीएस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. आता जेडीएससोबतच्या युतीबाबत भाजपमध्येही नाराजी जाणवू लागली आहे. माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री डी. व्ही.सदानंद गौडा यांनी भाजप हायकमांडकडून जेडीएसशी युतीबाबत सुरु असलेल्या हालचालीवर नाराजी व्यक्त केली आहे.
या युतीबाबत कर्नाटक भाजपच्या कोणत्याही नेत्याशी वरिष्ठांनी चर्चा केलेली नाही. माजी मंत्री ईश्वरप्पा यांच्यानंतर पक्षाच्या हायकमांडने राज्य भाजपमध्ये नेतृत्व निवडण्यास उशीर केल्याबद्दल नाराजी व्यक्त करणारे डी.व्ही.सदानंद गौडा यांनी, विरोधी पक्षनेते आणि प्रदेशाध्यक्षाची निवड लवकरच करा अशी मागणी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.
0 Comments