- खानापूर पोलिसांनी कोल्हापुरातून घेतले ताब्यात
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील भीमगड अभयारण्य क्षेत्रात पास्टोळी गावातील एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केलेल्या नराधमाला खानापूर पोलिसांच्या पथकाने कोल्हापुरातून ताब्यात घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. शाहू गावडे (वय ३८) असे त्या नराधमाचे नाव आहे.
खानापूर पोलिस स्थानकात पोस्को कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर पिडीत अल्पवयीन बालिकेवर खानापूर येथील सरकारी प्राथमिक रुग्णालयात उपचार करुन, तिला वैद्यकीय तपासणीसाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयातील पोस्को सेल येथे पाठविण्यात आले आहे. त्याठिकाणी तिच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.
ही घटना काही दिवसांपूर्वी पास्टोळी येथील जंगलात घडल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी खानापूर पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे. डीवायएसपी रवी नायक, खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
0 Comments