बेळगाव / प्रतिनिधी
मी नेहमीच जातिव्यवस्थेच्या विरोधात राहिलो आहे, पण वंचित समाजाने त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी संघटित होणे चुकीचे नाही असे मत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केले. बेळगाव जिल्हा क्रीडांगणावर, नेहरूनगर येथे आयोजित शेफर्ड इंडिया इंटरनॅशनलच्या ९ व्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले वंचित समाज संघटित नसल्यामुळे आणि आपापसात नेतृत्व विकसित करत नसल्याने हक्क आणि राजकीय शक्तीपासून वंचित राहतो. समाजातील सर्व जाती - वर्गातील लोकांनी घटनात्मक अधिकार मिळविण्यासाठी संघटित व्हावे मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी,वंचित जातीतील लोकांनी त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी संघटित अधिवेशन घेणे चुकीचे नाही असे म्हणे होते त्यानुसार हे अधिवेशन सुरू आहे, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी टीकाकारांना उत्तर दिले.
आपल्या समाजाला राजकीय इतिहास आहे. सांस्कृतिक वैभव आहे. मात्र संघटनेच्या कमतरतेमुळे आम्हाला श्रेय मिळू शकले नाही. संघटना नसती तर कागिनेले गुरुपीठ, संस्थान बनले नसते. कागिनेले पीठ हा मठाचा प्रकार नाही. ते सर्व शोषित समाजाचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या विकास झाला पाहिजे आणि प्रत्येकाला सामर्थ्य आणि संधी मिळायला हवी, तरच समान समाज निर्माण होऊ शकतो.आमच्यावर टीका करणाऱ्यांना ही अक्कल नाही.आपला जातीय आणि भेदभाव करणारा समाज आहे. त्यामुळे संधींच्या वाटपात भेदभाव केला जातो. या सगळ्याची भरपाई करण्यासाठी संघटना आणि संमेलने आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
0 Comments