मण्णूर / विनय कदम
मराठा समाजाच्या आर्थिक शैक्षणिक सामाजिक विकासासाठी कर्नाटक मराठा विकास निगम मधून मिळणाऱ्या सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आज संध्याकाळी ठीक ७.३० वा. कलमेश्वर मंदिर कल्लेहोळ (ता. बेळगाव) येथे मराठा समाजाच्या युवक व युवतींसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी मराठा समाज बेळगाव जिल्हा संयोजक व भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण माजी अध्यक्ष विनय विलास कदम यांच्यासह मराठा संघटन बेळगावचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी मराठा समाजातील बांधवांनी व महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
0 Comments