- वाघनखाचे पेंडंट वापरल्याप्रकरणी चौकशी
हुबळी / वार्ताहर
कर्नाटकात राजकीय नेते आणि अभिनेत्यांवर वाघाच्या नखांपासून बनवण्यात आलेले पेंडंट वापरून त्याचे फोटो समाज माध्यमांवर प्रसारित केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. याबाबत सोशल मीडियावर जनतेकडून चर्चा सुरू झाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हुबळी - धारवाड काँग्रेसचे युवा नेते आणि महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या बहिणीचा जावई रजत उल्लागड्डीमठ यांच्या हुबळी शहरातील लोणी बाजार येथील निवासस्थानी भेट देऊन पाहणी केली. तसेच त्या वाघ नखाच्या पेंडंटचा नमुना ही जप्त केला आहे.
तत्पूर्वी प्रसारमाध्यमांवर वाघ नखाचे पेंडंट घातलेला फोटो व्हायरल झाल्यानंतर रजत उल्लागड्डीमठ यांनी ते पेंडंट वाघ नखाचे नसून त्याचाच एक नमुना आहे. लग्नाच्या वेळी फोटोशूट साठी मी त्याचा वापर केला होता, तो आता व्हायरल झाला आहे. अशी प्रतिक्रिया दिली होती.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून रजत उल्लागड्डीमठ यांच्याप्रमाणेच राज्याचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी, कन्नड अभिनेता दर्शन, अध्यात्मिक गुरु विनय गुरुजी, यांच्यासह कन्नड बिग बॉस मधील एका स्पर्धकाची चौकशी करण्यात येत आहे.
0 Comments