- राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचे प्रतिपादन
- व्हीटीयुत उच्च शिक्षणातील डिजिटल परिवर्तन या विषयावरील परिषदेचा समापन समारंभ
बेळगाव / प्रतिनिधी
दक्षिण विभागीय कुलगुरूंच्या परिषदेत मांडण्यात आलेले मुद्दे आणि ठराव देशाच्या तंत्रशिक्षणाला मोठा हातभार लावतील,असे प्रतिपादन राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी केले. बेळगाव येथील विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटी (व्हीटीयु) मध्ये असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजतर्फे आयोजित दक्षिण विभागीय कुलगुरूंच्या उच्च शिक्षणातील डिजिटल परिवर्तन या विषयावरील परिषदेच्या समापन समारंभात ते बोलत होते.
जगातील विकास हा आता तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. तर तंत्रज्ञान दिवसागणिक बदलत आहे. तेव्हा तांत्रिक कौशल्यात प्रभुत्व मिळवण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.आता कृषी क्षेत्रातही तंत्रज्ञान विकसित झाले आहे. भारतातही अकल्पनीय परिवर्तन झाले आहे. या परिषदेत मांडलेले विषय आणि ठराव देशाच्या तंत्रशिक्षणासाठी मोठे आहेत त्याला हातभार लावू द्या ; असे आवाहन राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी केले.
या परिषदेत व्हीटीयूचे कुलगुरू विद्याशंकर, जी.डी.शर्मा, मेघना, डॉ.पंकज मित्तल सहभागी झाले होते.
0 Comments