- समिती नेते आर. एम. चौगुले, ग्रा. पं. अध्यक्ष - उपाध्यक्षांच्या हस्ते देण्यात आली चालना
सुळगा (हिं.) / वार्ताहर
आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या निधीतून मण्णूर (ता. बेळगाव) येथे सीडी - गटार बांधकामास सुरुवात करण्यात आली. म. ए. समितीचे नेते आर. एम. चौगुले, ग्रा. पं. अध्यक्षा लक्ष्मी यळगुकर व उपाध्यक्ष शंकर सुतार यांच्या हस्ते पूजन करून बांधकामाला प्रारंभ करण्यात आला.
गावात स्वच्छता तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी सीडी वर्क व गटार बांधकामाची गरज आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने अग्रक्रमाने हे काम हाती घेतले आहे. यापुढेही तातडीची विकास कामे प्राधान्याने करण्यासाठी आमच्या प्रयत्नांना ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी म. ए. समिती नेते आर. एम. चौगुले यांनी केले.
याप्रसंगी ग्रा. पं. सदस्या श्रद्धा सांबरेकर, सरिता नाईक, नागेश चौगुले, दत्तू चौगुले, शंकर सांबरेकर, शिवाजी मंडोळकर, विक्रम येळगूकर, निरंजन अष्टेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments