• बेळगावच्या प्रीतीची  'द व्हाईस ऑफ जर्मनी' कार्यक्रमासाठी निवड 

बेळगाव / प्रतिनिधी 

भारतातील तरुण मुलांसाठी असणाऱ्या 'सुर नवा ध्यास नवा' सारख्या कार्यक्रमाप्रमाणे जर्मनीतील 'द व्हॉइस ऑफ जर्मनी' या कार्यक्रमासाठी बेळगावच्या कन्येची निवड झाली आहे. मूळच्या बेळगाव येथील आणि सध्या स्विझर्लंडस्थित अनिता पवार यांची सुकन्या प्रीती पवार हिची जर्मनीमधील 'द व्हाईस ऑफ जर्मनी' या कार्यक्रमात गायनाची संधी लाभली आहे. या कार्यक्रमासाठी तिथे दिलेल्या ब्लाईंड ऑडिशन मधून एक मुखाने तिची निवड झालेली आहे.

या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇

प्रीतीला बालपणापासूनच संगीताची आवड असून चर्चमध्ये होणाऱ्या गाण्यांमध्ये भाग घेत असतानाच स्वबळावर गिटार, पियानो शिकत गेली.  हळूहळू नातेवाईक व मित्र-मैत्रिणी यांच्या घरगुती समारंभामध्ये आवडीने उत्स्फूर्तपणे ती गाऊ लागली. सध्या विशेष मुलांच्या स्कूलमध्ये काम करणाऱ्या प्रीतीने आपली बहीण मिनूच्या लग्नाचे गाणे देखील स्वतः कंपोज केलेले असून आता स्वतःला युरोप खंडामधील जर्मन देशातील  बर्लीन सारख्या मोठ्या शहरामध्ये सिद्ध करण्याकरिता तिची धडपड सुरु आहे. 

बार्बी गर्लचे गाणे एका वेगळ्या धर्तीवर अविष्कारित करून  नवा इतिहास घडविला आणि जुरी म्हणून काम पाहणाऱ्या रोनन कीटिंग या प्रसिद्ध आयरिश गायकांनी ज्यांचे "व्हेन यू से नथिंग ऍट ऑल" हे गाणे अतिशय प्रसिद्ध आहे त्यांनी शिरीन या रॅप संगीतासाठी प्रसिद्ध असलेल्या जुरिंच्या खुर्चीचे बटन दाबून त्यांना ब्लॉक केले व प्रीतीची आपल्या ग्रुपसाठी निवड केली. तिच्या या निवडीबद्दल युरोपातील सर्व वर्तमानपत्रातून व टीव्ही चॅनल्सवरुन सर्वत्र तिचे कौतुक होत असून संगीताच्या माध्यमातून बेळगावच्या या कन्येने एक मराठी नाव व बेळगावचा झेंडा युरोपच्या टीव्ही चॅनलवर मोठ्या डौलाने फडकविला आहे. प्रीतीही बेळगावच्या सुप्रसिद्ध नाट्य वितरक अनंत जांगळे यांची भाची आहे. 

अशा या भारतीय वंशाच्या कन्येचे संगीत 'सर्वांसाठी संगीत' हे ब्रीदवाक्य असलेल्या spotify या डिजिटल म्युझिक सर्विसवर देखील प्रचंड प्रमाणात गाजते आहे जे ऐकण्यासाठी  खालील लिंक सर्वांसाठी खुली आहे.