• संसारोपयोगी साहित्य जळून खाक 

सांबरा / वार्ताहर 

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. तानाजी गल्ली ,बसवण कुडची (ता. बेळगाव) येथील अशोक बाबू लक्ष्मनावर यांच्या घरी आज सकाळी ६ वा. ही घटना घडली. या घटनेत  फ्रिज, कपडे, घरातील महत्त्वाची कागदपत्रे, खुर्ची, साठलेले धान्य आदि संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. 

आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी आग विजविण्याचा प्रयत्न केला ; पण आगीने तोपर्यंत रौद्ररूप धरण केले होते.दरम्यान घटनेची माहिती मिळताच नगरसेवक बसवराज मोदगेकर यांनी तातडीने अशोक लक्ष्मनावर यांची भेट घेऊन झालेल्या नुकसानीची  पाहणी करून त्यांना आर्थिक मदत केली. 

तसेच हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. यावेळी तलाठी नयना गौडा यांनीही फोनद्वारे संपर्क साधून अशोक लक्ष्मनावर यांची विचारपूस केली आणि  तलाठी कार्यालयातून राजू पोनजी यांना घटनास्थळी पाठवले.