धारवाड / वार्ताहर 

परिवहन बस आणि दुचाकी यांची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.धारवाड तालुक्यातील नवलगुंद मार्गावर हेब्बळी गावाजवळ धारवाड ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. अपघातातील मृत दुचाकीस्वाराची अद्याप ओळख पटलेली नाही. 

याबाबत घटनस्थळावरून प्राप्त माहितीनुसार, अपघातावेळी केएसआरटीसी परिवहनची बस सिंधनूरहून धारवाडकडे येत होती. यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकी बसला धडक बसल्याने हा अपघात झाला. या घटनेची नोंद धारवाड ग्रामीण पोलीस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.