कित्तूर / वार्ताहर 

राज्यात यंदा  दि.२३ ते २५ ऑक्टोबर २०२३ दरम्यान (तीन दिवस) कित्तूर उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. त्यादृष्टीने सर्व तयारी सुरू असून अनुदान वाटपासाठी प्रयत्न केले जातील. किमान तीन कोटी रुपये यासाठी सरकारकडून मंजूर केले जातील,"असे सार्वजनिक बांधकाम सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कित्तूर, येथे झालेल्या प्राथमिक बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

याप्रसंगी  कित्तूर येथील मडीवाळ राजयोगिंद्र स्वामीजी यांनी उत्सव शांततेत  साजरा करण्यासाठी सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले . तर प्रास्ताविकात  बैलहोंगलचे उपविभागीय अधिकारी प्रभुपती फकीरपुरे यांनी गतवर्षी दोन कोटी रुपयांचे अनुदान जाहीर झाले होते. यावेळी पाच कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी करणारा प्रस्ताव सादर पाठवण्यात आल्याचे  सांगितले.

या बैठकीला  जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, कन्नड व संस्कृती विभागाच्या उपसंचालक विद्यावती बजंत्री, विविध उपसमित्यांचे अध्यक्ष व जिल्हास्तरीय अधिकारी कित्तूरच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो लोक उपस्थित होते.