मण्णूर / विनय कदम 

कल्लेहोळ (ता. बेळगाव) हायस्कूलची विद्यार्थिनी क्रांती वेताळ हिचा मराठा संघटन बेळगाव व विनय कदम समाजसेवा संघातर्फे सत्कार करण्यात आला. या विद्यार्थिनीने ३००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. याबद्दल भाजपा बेळगाव ग्रामीण माजी अध्यक्ष व बेळगाव जिल्हा मराठा समाज संयोजक विनय विलास कदम यांच्या उपस्थितीत कुमारी क्रांती वेताळ हिला शाल, हार व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. 

याप्रसंगी बोलताना  विनय कदम म्हणाले , आज आपला भारत देश नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा स्पर्धांमध्ये अव्वल ठरला आहे.  क्रांती वेताळ या विद्यार्थिनीने तीन हजार ३००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून आई - वडील, शिक्षकांसह, कल्लेहोळ गाव व  बेळगाव जिह्वा मराठा समाजाचे नाव राज्यस्तरावर पोहोचविले आहे.  येत्या ११ ते १४ ऑक्टोबर २०२३ दरम्यान होणाऱ्या दसरा क्रीडा स्पर्धेतही तिने राज्यात उज्ज्वल यश संपादन करावे अशा शुभेच्छा दिल्या. 

यावेळी मराठा संघटनचे संजय पाटील, लक्ष्मण चोपडे, राजू कंग्राळकर, अनिल पाटील, पिराजी पिराजी वेताळ, रुखमान्ना मरुचे, तुकाराम पाटील, ज्योतिबा वेताळ, सुरज पाटील, युवराज मरुचे आदी उपस्थित होते.