- विजयादशमी निमित्त उत्साहाला उधाण
बेळगाव / प्रतिनिधी
दसरोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सर्वांच्या उत्साहाला उधाण आले आहे. त्यामुळे विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी बेळगाव बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत आहे.
बेळगाव तालुक्याच्या काही गावांमध्ये शस्त्रपूजा 'खंडेनवमी' दिवशी तर काही ठिकाणी 'विजयादशमी' दिवशी केली जाते. त्यानुसार आज 'खंडेनवमी' व उद्या 'विजयादशमीच्या' निमित्ताने बाजारात हार, फुले, आंब्याची - केळीची पाने, नारळ, विडा, अगरबत्ती, लिंबू, कापूर, धूप आदि पूजेच्या साहित्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. खंडेनवमी व विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर शहरात ऊस आणि झेंडूच्या फुलांची आवक वाढली आहे.
-खंडे नवमीसाठी ऊस - झेंडूच्या फुलांची आवक-
मुख्य बाजारपेठेसह काकतीवेस रोड, यंदेखूट, सम्राट अशोक चौक यासह इतर ठिकाणी ऊस आणि झेंडूच्या फुलाची विक्री सुरू आहे. सुमारे ७० रुपयांना पाच याप्रमाणे ऊसाची विक्री सुरू आहे.
0 Comments