बेळगाव / प्रतिनिधी 

चाळीस हजारांची लाच स्वीकारताना अटक केलेल्या  जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांच्या घरी १३ लाख रुपयांची रोकड,30 तोळे दागिने आढळून आल्याची माहिती लोकायुक्त पोलिसांनी दिली आहे. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून न्यायालयासमोर हजर केल्यानंतर नलतवाड यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

चाळीस हजारांची लाच स्वीकारताना नलतवाड यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते.त्यामुळे जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला होता.नलतवाड त्यांच्या धारवाड येथील निवासस्थानी अधिकाऱ्यांनी तपास केला असता,तेथे १३ लाखांची रोकड व ३० तोळे सोन्याचे दागिने असे एकूण ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला. तो जप्त केला नसला तरी त्याची नोंद करून घेतल्याची माहिती लोक आयुक्त पोलिस अधीक्षक जे. रघु यांनी दिली आहे.