नवरात्रीच्या पाचव्या माळेला पिवळ्या रंगाची साडी परिधान 
करून पारंपारिक पेहरावात सौ. निकिता निलेश कलखांबकर 
फोटो सौजन्य : 
सौ. निकिता निलेश कलखांबकर,सुळगा (हिं.)

नवरात्री २०२३  : नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या नऊ दिवसांचे वेगवेगळे महत्त्व आहे. दुर्गा मातेची प्रत्येक रूपे तिच्या वेगवेगळ्या शक्तींसाठी ओळखली जातात. नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवीची संबंधित पूजा नवरात्रीचे नवरंग,आराधना आणि व्रत केले जातात. त्या नवरंगांचे या नऊ दिवसांमध्ये विशेष महत्त्व आहे.

यंदाच्या शारादीय नवरात्र उत्सवात पहिल्या चार माळांनाअनुक्रमे केशरी, पांढरा लाल, आणि निळ्या रंगाचे महत्त्व आपण जाणून घेतले.

  नवरात्रीच्या पाचव्या  माळेला पिवळ्या रंगाच्या
साड्या परिधान करून पारंपरिक वेशभूषेत
ताशिलदार गल्ली येथील जननी महिला मंडळाच्या
सर्व सदस्या. फोटो सौजन्य : सौ. रेश्मा राजू बाद्रे  

गुरुवार दि. १९ ऑक्टोबर २०२३ : पाचवी  माळ

आजचा रंग :  पिवळा

रंगाचे महत्त्व : प्रत्येक शुभकार्यासाठी पिवळ्या रंगाचा उपयोग होतो. उदा. फुल, हळद देवाची वस्त्रे, पूजेच्या वेळी पिवळे पितांबर नेसतात, मुलीच्या लग्नात पहिली साडी ही पिवळीस नेसवतात. सूर्यकिरणांशी संबंधित असा मन प्रसन्न प्रफुल्लित करणारा पिवळा रंग आहे. पिवळा रंग आपल्या भावनांशी जोडलेला असतो. मनोविज्ञानातील सगळ्यात शक्तिशाली आणि अवघड अशी पिवळ्या रंगाची ओळख आहे. बौद्धिक विकासासाठी, एकाग्रतेसाठी आणि मानसिक शांततेसाठी पिवळ्या रंगाचे महत्त्व अधिक आहे. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेली व्यक्ती प्रसन्न आनंदी दिसते आणि चेहऱ्यावर एक वेळेस तेज असते. आपल्यामध्ये विश्वासाने मैत्रीची भावना वाढवण्याचे काम पिवळा रंग करत असतो.