• ९३० किलो तांदूळ जप्त :  इंडी पोलिसांची कारवाई

विजयपूर / राहुल आपटे 

रेशनच्या तांदळाची बेकायदा वाहतूक करणाऱ्या चौघाना अटक करून सुमारे ९३० किलो तांदूळ जप्त करण्यात. प्राप्त झालेल्या खात्रीशीर माहितीनुसार विजयपूर जिल्ह्याच्या इंडी तालुक्यातील सालोटगी मार्गावर

इंडी पोलिसांनी ही कारवाई केली.

आफताब शेख, समीर बागवान, सादिक सुंबड व सय्यद सुंबड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ९३० किलो तांदूळ जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नोंद इंडी ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.