- बेळगाव जिल्ह्यातील जनतेचा लक्षणीय प्रतिसाद
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्यातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हा पोलिस विभागामार्फत आज घेण्यात आलेला १९ वा. फोन - इन कार्यक्रम यशस्वी झाला.
नूतन जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या या कार्यक्रमाला जनतेचा लक्षणीय प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील लोकांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून विविध समस्या सांगितल्या. जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी समस्या ऐकून घेतल्या आणि त्यावर तोडगा काढला. पोलिस आणि जनता यांच्यात समन्वय साधता यावा याकरिता माजी जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी हा उपक्रम सुरु केला होता. तो उपक्रम विद्यमान जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी पुढे सुरु ठेवला.
दरम्यान आज झालेल्या कार्यक्रमात अथणी येथील एका व्यक्तीने फोन करून तालुक्यातील बनावट पत्रकारांचा त्रास रोखण्याची विनंती केली. तसेच त्यांचा जनतेला खूप त्रास होत असल्याची तक्रार त्यांनी केली. यावर जिल्हा पोलिसप्रमुख भीमा शंकर गुळेद यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तर रायबाग तालुक्यातील एका व्यक्तीने फोन करून येथील पोलीस शेतात काम करू देत नाहीत.ते आमच्यावर अत्याचार करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार त्यांनी केली. यावर जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी संबंधित पोलिस स्थानकाशी संपर्क करून समस्या सोडविण्याची ग्वाही दिली, या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख वेणुगोपाल, निरीक्षक महादेव एस. एम. , बी.आर.गड्डेकर, पोलिस कर्मचारी श्रीशैल, रमेश आदी उपस्थित होते.
या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇
0 Comments