- बेळगाव मार्केट पोलिसांची कारवाई
बेळगाव / प्रतिनिधी
सोने व्यापाऱ्याकडून लाच स्वीकारणाऱ्या आयकर अधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. बेळगावात शहरात आज ही घटना घडली. अविनाश टोनपे या आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला मार्केट पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
आरोपी अधिकारी अविनाश टोनपे हा चिक्कोडी तालुक्यातील अंकली येथील परशुराम बंकापुर या सोन्याच्या दुकान मालकाला पैसे देण्यासाठी त्रास देत होता.
परशुराम बंकापुर यांचा व्यवसाय अनधिकृत असल्याचे सांगून त्याने बंकापूर यांच्याकडे १० लाखांची मागणी केली होती. परशुराम बंकापूर यांनी तात्काळ ही बाब मार्केट विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त एन. व्ही. बरमनी यांना कळविली आणि अविनाश टोनपे यांनी सांगितलेल्या ठिकाणी ४० हजार रुपयांचे एक पाकिट ठेवून तिथून निघून गेले.यावेळी फिल्मी स्टाईलने सापळा रचून मार्केट पोलिसांनी अविनाश टोनपेला रंगेहाथ अटक केली.
0 Comments