- शहापूर पोलिसांची कारवाई
बेळगाव / प्रतिनिधी
बेकायदेशीरपणे घराच्या छतावर गांजा पिकवून त्याची घरात साठवणूक केल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी एकास अटक केली. रोहन महादेव पाटील (वय २३,रा. घर क्रमांक २९४/१ रामदेव गल्ली ; सोनार गल्ली बोळ) वडगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
रोहन महादेव पाटील राहत असलेल्या घरावर पोलिसांनी धाड घातली. यावेळी घराच्या छतावर उगवलेल्या कच्च्या गांजाची (१७०० ग्रॅम वजनाची व ४५,६००/- रु. किंमतीची) १७ रोपे आणि घरात ठेवलेल्या तीन हजार रुपये किमतीच्या ६० ग्रॅम वजनाच्या गांजाच्या बिया आणि त्याची पाने असे दोन्ही मिळून ४८,६०० /- किमतीचा गांजा जप्त करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती शहापूर पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी शहापूर पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.
0 Comments