बेळगाव / प्रतिनिधी 

एक नोव्हेंबर काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर सायकल फेरीचा मार्ग आणि काळ्यादिनाबाबत पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांची मध्यवर्ती म. ए. समिती नेत्यांनी भेट घेऊन निवेदन सादर केले.

१९५६ असून महाराष्ट्र एकीकरण समिती १ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या पक्षपाती निर्णयाविरोधात काळादिन पळत आहे.

या दिवशी सकाळी निषेध फेरी निघते आणि त्यानंतर मराठा मंदिर येथे जाहीर सभा होते, अशी माहिती देण्यात आली.

यावेळी १ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता  धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोड,  राजेंद्र प्रसाद चौक, समादेवी गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, खडेबाजार, गणपत गल्ली मारुती गल्ली, हुतात्मा चौक, किर्लोस्कर रोड, रामलिंगखिंड गल्ली, हेमुकलानी चौक, शनि मंदिर, पाटील गल्ली, फोर्ट रोड, देशपांडे पेट्रोल पंप, फुलबाग गल्ली, ताशिलदार गल्ली, कपिलेश्वर रोड, कपिलेश्वर रोड,  भांदूर गल्ली, तानाजी गल्ली, संभाजी उद्यान, एसपीएम रोड, शिवाजी उद्यान, बसवाण गल्ली, पिंपळकट्टा, पी.बी.रोड, नार्वेकर गल्ली,बालाजी मंदिर, आचार्य गल्ली गाडेमार्ग, सराफ गल्ली, काकेरू चौक, बसवाण गल्ली, गणेशपूर, गल्ली,जेड गल्ली, डाक बंगला, कोरे गल्ली, कचेरी गल्ली, मीरापूर गल्ली, खडेबाजार, महात्मा फुले रोड गोवावेस सर्कल, खानापूर रोड, आरपीडी कॉर्नर सी.डी. देशमुख रोड,  पहिले रेल्वे गेट, शुक्रवार पेठ, गोवा वेस मराठा मंदिर पर्यंत फेरी काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर , रणजीत चव्हाण - पाटील, विकास कलघटगी, आनंद आपटेकर, सागर पाटील, वैभव कामत आदि उपस्थित होते