बेळगाव / प्रतिनिधी 

राज्यातील विणकर विविध कारणांमुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे बुधवार दि. ४ ऑक्टोबर रोजी समस्त विणकर समाजाच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

राज्यभरातील विणकर समाज आर्थिक मंदीमुळे तसेच बाजारातील स्थिर किमती अभावी शासनाच्या योजना विणकारांपर्यंत पोहोचत नाहीत. तसेच व्यवसायिक विज बिल कमी करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यंत्रमाग आणि त्रिलुप उपक्रमात कार्यरत असलेल्या लाखो विणकरांना कामगार सुविधांची गरज आहे. या आधी जाहीर केल्याप्रमाणे मोफत वीज योजना सरकारने लवकरात लवकर लागू करावी, अनेक विणकर कामगार आणि उद्योग कर्जाच्या जाळ्यात दररोज १० ते १२ तास काम केले तरी  त्यांची पुरेशी कमाई होत नाही. विणकर आर्थिक दृष्ट्या मजबूत नसतो. विणकर समाज सध्याच्या महागाईमुळे त्रस्त आहे. विणकारांच्या कुटुंबियांना किमान १० लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई द्यावी.  उद्या चार महिन्यांपासून सवलती देण्यासाठी कोणतीच हालचाल झालेली नाही. ती त्वरित मंजूर करून समस्त विणकारांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी  निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी मानकापूर, बेळगाव व इतर ठिकाणचे विणकर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.