बेंगळूर दि. ०१ ऑक्टोबर २०२३ 

कन्नड चित्रपट अभिनेते नागभूषण यांच्या कारची धडक बसून एका एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. बेंगळूरच्या वसंतनगर मुख्य मार्गावर शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. अपघातावेळी कार पहिल्यांदा विजेच्या खांबाला धडकली नंतर फुटपाथवरून निघालेल्या कृष्णा (वय ५८) आणि प्रेमा (वय ४८)  या दांपत्याला कारची धडक बसली. ही धडक इतकी जोराची होती की, प्रेमाचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या कृष्णा यांना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी केएस लेआउट वाहतूक पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.