- मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिल्या शुभेच्छा
कडोली / वार्ताहर
बेळगाव येथील जिल्हा क्रीडांगणावर झालेल्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत कडोली (ता. बेळगाव) येथील खो - खो संघाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या संघाची दसरा क्रीडा स्पर्धेसाठी विभागीय स्तरावर निवड झाली आहे. या यशाबद्दल मंत्री सतीश जारकीहोळी यांनी यमकनमर्डी मतदारसंघातील कडोली गावाच्या खो-खो संघाला आर्थिक मदत करून शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी प्रशिक्षक एन. आर. पाटील यांनी गावातील मुलांची विभागस्तरासाठी निवड होणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगून त्यांनी दसरा क्रीडा स्पर्धेत विजय मिळवून बेळगावची शान वाढवावी, अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी यांचे स्वीय सहाय्यक मलगौडा पाटील, युवा सक्षमीकरण क्रीडा विभागाचे उपसंचालक बी. श्रीनिवास, यल्लाप्पा बडकन्नवर आदी उपस्थित होते.
विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा आजपासून पाच दिवस चालणार असून, कारवार जिल्ह्यातील मुंडगोड तालुक्यातील स्टेडियमवर होणाऱ्या विभागस्तरीय दसरा क्रीडा स्पर्धेत बेळगावचे संघ खोखो व थ्रोबॉलमध्ये भाग घेणार आहेत.
0 Comments