खानापूर / प्रतिनिधी
'जनता दर्शन' कार्यक्रमाच्या माध्यमातून तालुकास्तरावर रस्ते गटार, वीज, पिण्याचे पाणी, आरोग्य आदि मूलभूत समस्या तातडीने सोडविणे हा उद्देश आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले. नंदगड येथे आयोजित जनता दर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा पंचायत, महसूल, वन यासह सर्व विभागांचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने जनतेला त्यांच्या समस्या कळविणे व त्यांचे निराकरण करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खानापूर तालुक्यात दहा वर्षांनंतर जनता दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यात महिन्यातून एकदा व पंधरवड्यातून एकदा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जनता दर्शन घेण्यात येत आहे. हलगेकरेंनी तालुक्यात पहिल्या कार्यक्रमासाठी खानापूरची निवड केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, लोकांच्या तक्रारी घेण्यासाठी विभागनिहाय दहा काउंटर उभारण्यात आले आहेत. प्रत्येक अर्ज स्वीकारला जातो. तक्रार निवारणासाठी काय पावले उचलावी त्याची माहिती अर्जदाराला दिली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
तक्रारींचे निवारण करण्यासाठी जनता दर्शन मध्ये कारवाई केली जाईल. विभागाचे अधिकारी योग्य ती कारवाई करतील. जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जनता दर्शन मध्ये कारवाई केली जाईल. जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, तालुका जिल्हा व राज्य स्तरावर सोडवता येणाऱ्या समस्यांचे निराकरण करून ठराविक कालावधी त्या सोडविण्याबाबत पावले उचलली जातील.
दर पंधरवड्याला एका तालुक्यात जनता दर्शन घेतले जाते. जिल्हास्तरावर नंदगड येथे पहिल्या तालुक्याच्या जनता दर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा गुरव, उपाध्यक्ष संगीता मद्दीमणी, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार कोनकेरी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख वेणुगोपाल, आय.ए.एस अधिकारी शुभम शुक्ला, उपविभागीय अधिकारी श्रावण नायक, कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, अन्न विभागाचे सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी, पशुसंवर्धन विभागाचे उपसंचालक डॉ. राजीव कुलेर आदि उपस्थित होते. खानापूर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी स्वागत केले.
महसूल, ग्रामविकास, वन, उत्पादन शुल्क, पोलीस, अन्न, आरोग्य पशुसंवर्धन, हेस्कॉम फलोत्पादन शिक्षण यासह विभागनिहाय काउंटर उघडले जातील आणि लोकांकडून अर्ज स्वीकारले जातील. अशिक्षित आणि ज्येष्ठ नागरिकांना लेखी तक्रारी करता याव्या त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतंत्र केंद्र सुरू करून मदत केली. सकाळपासून शेकडो लोकांनी आपल्या तक्रारी केल्या यावेळी व्यासपीठावर उपस्थित आमदार जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनीही जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर तक्रारींचे त्वरित निवारण करण्याच्या सूचना दिल्या.
0 Comments