मण्णूर दि. २९ ऑक्टोबर / विनय कदम 

दि. मार्कंडेय को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड मण्णूर, बेळगाव या संस्थेला राष्ट्रीय आदर्श सहकारी संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दिल्ली, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील अगदी निवडक संस्थांमधून मार्कंडेय को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि. मण्णूर, बेळगाव संस्थेची सदर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

बेळगाव येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात संस्थेच्यावतीने चेअरमन प्रसाद रामचंद्र चौगुले यांनी हा सन्मान स्वीकारला. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांच्याहस्ते संस्थेचे चेअरमन प्रसाद रामचंद्र चौगुले यांना पुरस्कार व मानचिन्ह प्रदान करण्यात आले. 




यावेळी त्यांच्या समवेत संस्थेचे संचालक रतनसिंग भवानी, भाजपा नेते विनय विलास कदम, संस्थेचे सचिव वसंत भेकणे उपस्थित होते. संस्थेला प्राप्त झालेल्या पुरस्काराबद्दल चेअरमन प्रसाद रामचंद्र चौगुले यांनी संस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी, सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक व सहकाऱ्यांचे अभिनंदन करत सर्वांना धन्यवाद दिले.