बेळगाव / प्रतिनिधी
लोकायुक्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करत आज सकाळी दोन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी धाड घातली.बेळगाव पंचायत राज विभाग एईई एस. एम. बिरादार यांच्या घरावर लोकायुक्त विभागाचे एसपी हनुमंत राय यांच्या नेतृत्वाखाली डीएसपी जे. रघू यांच्या पथकाने धाड घातली.
बेकायदेशीरपणे मालमत्ता खरेदी केल्याच्या आरोपावरून लोकायुक्तांनी विश्वेश्वरय्या नगर मधील श्रद्धा अपार्टमेंट तसेच कित्तूर आणि खानापूर येथे निवासस्थानावर धाड घालून तपासणी केली.
याशिवाय कलबुर्गी जिल्ह्यातील नगर प्लॅनर आप्पासाहेब कांबळे यांच्याघरावरही धाड घालण्यात आली. रामतीर्थनगर निवासस्थान, ऑटोनगर इरो कारखान्यावर धाड घालून शोध मोहीम राबवली जात आहे.
0 Comments