सुळगा (हिं.) / वार्ताहर
बालाजी मल्टीपर्पज को.ऑप. सोसायटीची ११ वी विशेष सर्वसाधारण सभा रविवार दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक ३ वा. संस्थेच्या सुळगा (हिं) येथील कार्यालयात पार पडली.
प्रारंभी सोसायटीचे चेअरमन मनोज नारायण कलखांबकर तसेच व्हा. चेअरमन अजित मल्लाप्पा कलखांबकर यांनी उपस्थित मान्यवर आणि सर्व सभासदांचे स्वागत केले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत सभासदांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून सभेला सुरुवात झाली.
यानंतर सोसायटीचे व्यवस्थापक आकाश सु. कोवाडकर यांनी ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल, ताळेबंद पत्रक, नफा- तोटा पत्रक, नफा विभागणी, अंदाजपत्रक व अन्य विषयांची माहिती दिली. तसेच सोसायटीला सन १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या आर्थिक वर्षामध्ये ७ लाख ५३ हजार ९९१ रुपये निव्वळ नफा झाल्याचे सांगण्यात आले आणि सभासदांना १४ टक्के डीव्हीडंट जाहीर करण्यात आला.
यावेळी सोसायटीचे सर्व सभासद व संचालक मंडळ यांनी एकमताने अहवालास मंजुरी दिली. सदर सभेस सोसायटीचे सर्व सन्माननीय संचालक , 'अ' वर्ग सभासद आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. संचालक यल्लाप्पा सि. कलखांबकर यांनी आभार मानले.
0 Comments