•  ठोठावला २१ कोटींहून अधिक दंड 

बेळगाव / प्रतिनिधी  

बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुर्गुंडी यांनी निकृष्ट दर्जाच्या कामासाठी एलअँडटी कंपनीला २१ कोटी ४६ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

बेळगावला सतत पिण्याचे पाणी पुरवण्याची व इतर कामांची जबाबदारी असलेल्या एलअँडटी कंपनीने २०२१-२०२५ निविदा प्राप्त केली होती. मात्र सध्या तीन वर्षाचा कालावधी पूर्ण होऊ नही केवळ साठ टक्केच काम झाले आहे. निर्धारित वेळेत उद्दिष्ट पूर्ण न करणे, निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यासंदर्भात महापालिकेने कंपनीवर मोठा दंड ठोठावला आहे.

महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी १२ सप्टेंबर रोजी कंपनीला कारणासह पत्र पाठवल्याची माहिती दिली आहे.