- हुबळी शहराच्या सिल्व्हर टाऊन येथील घटना
हुबळी / वार्ताहर
धारदार शस्त्रांनी वार करून तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. सिल्व्हर टाऊन हुबळी येथे ही घटना उघडकीस आली. मौलाली (वय २४ ; रामरगडी, ता.मुंदगोड, जि.उत्तर कन्नड) असे मृत तरुणाचे नाव आहे.
तो हुबळी येथे प्लास्टरचे काम करण्यासाठी आला होता. हल्लेखोरांनी बांधकाम सुरू असलेल्या घरात त्याची हत्या करून पलायन केले. हत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान घटनेची माहिती मिळताच गोकुळ रोड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद गोकुळ रोड पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. पोलिस तपासानंतरच खुनाचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
0 Comments