बेळगाव / प्रतिनिधी
वीरभद्रनगर बेळगाव मधील रहिवासी शाबाज जमादार यांची दोन वर्षीय कन्या आयत जमादार या चिमुकलीचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदविले गेले आहे. आयतने फ्रुट्स, वाहने, शरीराचे अवयव, इलेक्ट्रिकल वस्तू, प्राणी, पक्षी, वैद्यकीय उपकरण यांची ओळख पटवून आपली एक नवीन ओळख बनविली आहे.
या पूर्वी आयत च्या आई - वडिलांनी मुलीला मोबाईल पासून दूर ठेवून पुस्तकावर जास्त भर दिला. आयत हिला तिची आई रोज पुस्तकांमधील चित्रांची ओळख करून देत होती. आज त्यांच्या या प्रयत्नाला यश झाले. इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड मध्ये आपल्या बेळगावचे नाव या चिमुकलीने रोशन केले आहे. त्याबद्दल आयत हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments