- श्रीलंकेविरुद्ध एकतर्फी विजय
- आशिया चषकावर पाचव्यांदा कोरले नाव
कोलंबो: श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताने १० विकेट्सने विजय मिळवत आशिया चषक २०२३ चे विजेतेपद आपल्या नावे केले आहे. गेल्या बऱ्याच वर्षात भारताने एकही मोठी टूर्नामेंट न जिंकल्याचा दुष्काळ भारताने आशिया चषक जिंकून संपवला आहे. भारताकडून सलामीला आलेल्या शुभमन गिल आणि इशान किशन यांनी अवघ्या ६ षटकात सामना भारताच्या नावे केला. श्रीलंकेने भारताला सर्वात कमी ५१ धावांचे आव्हान दिले होते.
भारताकडून इशान किशन आणि शुभमन गिलच्या वेगवान फलंदाजीने श्रीलंकेच्या गोलंदाजांना खेळण्याची संधी दिली नाही. रोहित शर्मा सलामीसाठी न उतरता त्याने इशान आणि गिलची जोडी पाठवली. रोहित शर्माने आणि संघाने दाखवलेला विश्वास या दोघांनीही सार्थ करून दाखवलं आणि संघाला विजय मिळवून देतच परतले.
भारताने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आपली पकड मजबूत ठेवली होती. या अंतिम सामन्यात श्रीलंकेने केवळ नाणेफेक जिंकली पण सामन्यात त्यांना एकदाही आपला प्रभाव पाडण्याची संधी भारताच्या खेळाडूंनी दिली नाही. श्रीलंकेने नाणेफेक जिंकत भारताला गोलंदाजीसाठी पाचारण केले आणि भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे लंकेचा संपूर्ण संघ गडबडला. सिराजच्या माऱ्यामुळे आशियातील सर्वात मोठ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या श्रीलंकेने लोटांगण घातले.यामुळे सामना एकतर्फी झाल्याचे पाहायला मिळाले.
वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या दहा षटकांच्या आत पाच विकेट घेण्याचा पराक्रम झाला आहे. असा पराक्रम करणारा सिराज एकमेव भारतीय गोलंदाज आहे. हार्दिक पांड्या याने अखेरच्या तीन फलंदाजांन तंबूचा रस्ता दाखवला. टीम इंडियाने श्रीलंकेला ५० धावांवर रोखले. मोहम्मद सिराजने भारतासाठी दमदार गोलंदाजी केली. त्याने ७ षटकात २१ धावा देत ६ बळी घेतले. सिराजनेही एक षटक निर्धाव टाकले. हार्दिक पांड्याने २. २ षटकात ३ धावा देत ३ बळी घेतले. बुमराहने एक विकेट घेतली. त्याने ५ षटकात २३ धावा दिल्या. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने सर्वाधिक १७ धावा केल्या. हेमंताने १३ धावा केल्या. इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. श्रीलंकेचे पाच फलंदाज शून्यावर बाद झाले. तर चार फलंदाजांन दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. निसांका २, परेरा ०, समरविक्रमा ० असंलका ०, डी सल्वा ४ आणि शनाका ० धावांवर तंबूत परतले. आघाडीच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
0 Comments