- भ्रष्टाचार निर्मूल परिवार संघाची मागणी
- जिल्हापालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या विरोधात राजकीय षडयंत्र रचणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भ्रष्टाचार निर्मूल परिवार संघाने केली आहे. याबाबत आज जिल्हापालक मंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन सादर करण्यात आले.
अशोक दुडगुंटी हे बेळगाव महापालिकेत आयुक्त झाल्यानंतर जनतेच्या समस्या तत्परतेने जाणून घेत त्यांचे निवारण करत आहेत. याचा पोटशूळ उठलेल्या काही लोकांनी त्याचे राजकारण करून त्यांची बदली करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. काही राजकीय व्यक्तींच्या तक्रारीमुळे अधिकार्यांनी आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या विरोधात षडयंत्र रचले आहे. मनपातील काही राजकीय व्यक्तींचे बाहुले बनून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना तसेच स्थानिक राजकारण्यांना आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या प्रामाणिक कामाचे कौतुक नाही.
ही बाब गांभीर्याने घेत आयुक्त अशोक दुडगुंटी यांची कोणत्याही कारणास्तव बदली करू नये असे सांगून त्यांना येथेच ठेवावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी ॲड. एन.आर.लातूर, विनोद पाटील, रोहित लातूर, डी.एस.बालागी,अनिल शिंदे,यशवंत लमाणी, सुभाष कांबळे, रेणुकराज एच. ,सामाजिक कार्यकर्त्या सुजिता मुळगुंद उपस्थित होत्या.
0 Comments