• वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत 

सुळगा (हिं.) / वार्ताहर 

सुळगा (हिं.) येथील साईराम मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि. ची १० वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि. २५ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक २ वा. संस्थेच्या कार्यालयात पार पडली.

प्रारंभी संचालक राजन कृष्णा पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर सल्लागार समिती सदस्य कृष्णा ओ. पाटील यांनी श्री साईबाबा आणि लक्ष्मी देवी प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढविले. 




यानंतर परशराम फकीरा पाटील, प्रल्हाद लक्ष्मण पाटील, बळवंत ओमाण्णा पाटील, काशीराम ओमाण्णा पाटील, अनिल लक्ष्मण पाटील यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले.

सोसायटीचे संस्थापक तथा चेअरमन श्री.मारुती सोमाण्णा पाटील हे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी सोसायटीचे व्यवस्थापक  (मॅनेजर) वैजू कणबरकर यांनी  वार्षिक अहवाल, नफा-तोटा पत्रक, ताळेबंद याचे वाचन करताना सोसायटीची वार्षिक उलाढाल रु. १२,५१,५७,९०५.०० एवढी असून खेळते भांडवल रु. ५,४८,५६,०८७.७४ असल्याचे नमूद केले. गत आर्थिक वर्षात सोसायटीला रु.१०,३१,२१४.०० एवढा निव्वळ नफा झाल्याचे सांगितले. 

या सभेत सभासदांना १० टक्के डिव्हिडंट (लाभांश) जाहीर करण्यात आला. यावेळी सोसायटीच्या व्हा. चेअरमन सौ. नंदा यु. कदम यांनी सोसायटीच्या कामकाजाचा आढावा घेताना सोसायटीचे कामकाज समाधानकारक असून संस्थेचे हितचिंतक व सभासदांनी संस्थेकडे जास्तीत जास्त ठेवी ठेवून प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले.

सभेचे सूत्रसंचालन संचालक राजू कृष्णा पाटील यांनी केले. तर संचालक अमित काशीराम पाटील यांनी आभार मानले.