- नेगिल योगी सुरक्षा रयत संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यातील काकती गावाला दुष्काळग्रस्त घोषित करावे या मागणीसाठी आज नेगीलयोगी सुरक्षा रयत संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यंदा मान्सूनचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे. बेळगाव तालुक्यातही यंदा ५०% पेक्षा कमी पाऊस झाला आहे. परिणामी काकती गावातही भात पीक उध्वस्त झाले आहे. सुमारे चारशे एकर पेक्षा जास्त ऊस पिक व भात पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तेव्हा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून गावाला दुष्काळग्रस्त जाहीर करावे तसेच पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून योग्य तो मोबदला देण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी नेगील योगी सुरक्षा रयत संघाचे प्रदेशाध्यक्ष धर्मराजगौडा, नेगील योगी सुरक्षा रयत संघाच्या महिला कार्याध्यक्षा डॉ. हेमा कजागर यांच्यासह शेतकरी नेते उपस्थित होते.
0 Comments