- मुस्लिम युनियनची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
- आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
मुस्लिम, दलित आणि आदिवासी समाजावर सातत्याने होणाऱ्या हल्ल्याचा आज शुक्रवारी बेळगावात मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी मुस्लिम समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून तीव्र आंदोलन करण्यात आले. १ ऑगस्ट रोजी आरपीएफ जवान चेतनसिंह याने जयपूर - मुंबई रेल्वेमध्ये वापीजवळ गॊळ्या झाडून चौघांची अमानुष हत्या केली आणि आणि भाजप समर्थक आरएसएसच्या घोषणा दिल्या असा आरोप आंदोलकांनी केला. या कृत्याबद्दल चेतनसिंग याला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करून राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन सादर करण्यात आले.
काही दिवसांपासून मणिपूर येथे आदिवासी कुकी समाजाच्या लोकांचे शोषण सुरू आहे. महिलांना नग्न करून मारले जाते. माना मेपथ येथे मुस्लिमांच्या घरांवर दगडफेक, जाळपोळही करण्यात आली असून लुटमार सुरू आहे. ते केवळ मुस्लिम, दलित, आदिवासी असल्याने त्यांच्या वेगळ्या विचारसरणीमुळे त्यांचे शोषण आणि अत्याचार होत आहेत. तेव्हा याची सखोल चौकशी करून संबंधितांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या आंदोलनात बेळगाव परिसरातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0 Comments