- आ. शशिकला जोल्ले , खा. अण्णासाहेब जोल्ले यांचे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांना निवेदन
दिल्ली दि. ४ ऑगस्ट २०२३
कराड- निपाणी-बेळगाव या रेल्वे मार्गाचे काम सुरु करून पूर्णत्वाला न्यावे त्याचबरोबर विविध मार्ग सुरू करावे आणि मिरज-बेळगाव मार्गावर चिक्कोडी लोकसभा मतदार संघात येणाऱ्या काही स्थानकांवर जलद रेल्वे थांबाव्यात, अशी विनंती निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले आणि चिक्कोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केली. दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन जोल्ले दांपत्याने याबाबत निवेदन सादर केले. याप्रसंगी महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष अजित गोपछडे आणि बेळगाव भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष अध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते.
कर्नाटक - महाराष्ट्र सीमा भागातील लाखो नागरिकांची सोय लक्षात घेता, कराड-निपाणी-बेळगाव हा रेल्वे मार्ग महत्त्वाचा असल्याने त्याचे काम हाती घेऊन ते पूर्ण करावे याशिवाय शेडबाळ- अथणी - विजयपूर (BG), बेळगाव - कोल्हापूर (BG), बेळगाव - कित्तूर - धारवाड (BG), दुहेरीकरण - कॅसल रॉक- कुलें घाट - हसन मंगळुरु (रूट) हे मार्ग सुरु करण्याबरोबरच मिरज - बेळगाव मार्गावर चिक्कोडी लोकसभा मतदार संघातील हुबळी - दादर एक्सप्रेस (उगार) , शरावती व पुडुचेरी एक्सप्रेस (शेडबाळ), अजमेर व हरिप्रिया एक्सप्रेस (कुडची,रायबाग, चिकोडी रोड स्टेशन) येथे थांबविण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
0 Comments