हुबळी / वार्ताहर
हुबळी शहराच्या हद्दीवर गदग रिंगरोडनजीक झालेल्या तिहेरी अपघातात एक ठार तर दोघेजण जखमी झाले. रफीक नदाफ (वय ३४) असे मृताचे नाव असून तो वाणिज्य कर विभागाच्या अंमलबजावणी विभागाच्या वाहनावर चालक म्हणून काम करत होता.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार वाणिज्य कर विभागाचे अधिकारी टाटा सुमो गाडीतून जनजागृतीचे काम करत होते. यावेळी पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकने सुमोला जोराची धडक दिली. यावेळी सुमो गाडीची सामोरुन येणाऱ्या अन्य एका ट्रकला धडक बसून हा अपघात झाला. या अपघातात वाहनातील दोन अधिकारी थोडक्यात बचावले. याप्रकरणी पूर्व रहदारी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments