- पारवाड ग्रा. पं. सरपंच भिकाजी गावडे यांची माहिती
खानापूर / प्रतिनिधी
चोर्ला ते जांबोटी दरम्यान मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी रस्त्याची अक्षरशः वाताहत झाली आहे. गोवा आणि बेळगावला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी या मागणीसाठी सोमवार दि. ४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९.३० वा. कणकुंबी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. तरी जांबोटी आणि चोर्ला गावातील ग्रामस्थांनी प्रत्येक घरातील एक व्यक्ती यानुसार आंदोलनात सहभाग घ्यावा असे आवाहन पारवाड ग्रा. पं. सरपंच भिकाजी गावडे यांनी केले.
बेळगाव जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख, मामलेदार, सर्व पोलिस स्थानक यांना रास्तारोको आंदोलनाची पूर्वकल्पना देण्यासाठी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून त्यांनी ही माहिती दिली.
शासन व ठेकेदाराकडून खराब झालेला चोर्ला रस्ता पूर्ववत चांगला करून घेण्यासाठी सोमवारी सकाळी ९.३० वा. सर्वांनी कणकुंबी बस थांब्यानजीक एकत्र येऊन सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
0 Comments